जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वृद्धांना जवळच्या नातेवाईकांची ओळख देवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लांबविणारा संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. डिगंबर कौतिक मानकर (वय-५२, रा. हरीओमनगर, आसोदारोड, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यात वृद्धांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची ओळख देवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहण्यासाठी घेवून त्यांना परत न करता त्यांची फसवणुक होत असल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटना उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करुन तपास करण्यासाठी रवाना केले होते. दरम्यान, वृद्धांना लुटणारा संशयित शनिपेठ परिसरात राहत असल्याची माहिती बकाले यांना मिळाली. त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी राहुल पाटील व अनिल कांबळे यांना सोबत घेवून संशयिताच्या शोधार्थ रवाना केले.
संशयित डिगंबर कौतीक मानकर हा हरिओम नगरात फिरत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गेल्या १२ दिवसांपुर्वी डिगंबर मानकर हा पारोळा येथील नगरपालिकेच्या चौकात गेला होता. याठिकाणी त्याने एका वृद्धाला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे खोटे नाव सांगत त्यांना गोंधळात टाकले. त्यानंतर वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेत त्याठिकाणाहून पळून गेला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. ही कारवाई सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे, दीपक पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, राहूल बैसाणे, सचिन महाजन यांच्या पथकाने केली.