वुमेन्स ॲन्ड चाईल्ड केअर प्लसतर्फे औद्योगिक पहाणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील वुमेन ॲन्ड चाईल्ड केअर प्लस संस्थेच्या कार्यकर्त्यांनी काल रोजी दि.३१ मार्च रोजी औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास दौरा आयोजित केला होता.

 

येथील एम.आय.डी.सी. भागातील कॅपोज या  प्लास्टीक  उपकरणे उत्पादन फॅक्टरीला भेट दिली. यावेळी  या फॅक्टरीत उत्पादित होत असलेल्या ‘दिपसागर  हाऊस होल्ड’  या मालाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती कंपनीचे संचालक सुनील कपोते आणि सागर कपोते यांनी दिली. कच्चा माल त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या रंगात दाणे बनविणे आणि त्यापासून गेल्या, बादल्या,स्टुल,ड्रम अशा २२ वस्तुंचे उत्पादन होत असल्याचे कपोते पिता, पुत्रांनी सांगितले. सागर कपोते हा उच्च शिक्षित असतांनाही त्याने नोकरी न करता उद्योगाकडे केंद्रीत झाला हे उल्लेखनीय आणि तरुणांना प्रेरणादायी असल्याचे मत संस्थेच्या अध्यक्ष शांता वाणी यांनी व्यक्त केले.तर उपस्थित सर्वच महिलांनी फॅक्टरीचे कामकाज पाहून आनंद व्यक्त केला.

 

 

कंपनी भेट प्रसंगी वुमेन

ॲन्ड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्या अध्यक्ष – शांता वाणी- उपाध्यक्ष- बबिता पंडीत, सचिव- छाया पाटील,सह सचिव – निवेदिता ताठे, कोषाध्यक्ष – संगिता यादव, तसेच ॲड.शिल्पा रावेरकर, हेमलता कुलकर्णी, अनिता बडगुजर, रुपाली पवार,शालिनी पाटील, पुजा पंडीत, ज्योती दातेराव, मीना कुलकर्णी, स्मिता वेद, शामल शिंदे, निता गुरव, वंदना पांडे, सायली चंद्रात्रे, कविता नाईक अशा २० सदस्यांनी भाग घेतला होता. यावेळी कोपोज कंपनी तर्फे आलेल्या भगिनींचा आदर सत्कार करण्यात आला तर संस्थे तर्फे कपोते द्वयांचे व कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Protected Content