रावेर प्रतिनिधी । पाल-रावेर रस्त्यावर असणार्या वीट भट्टीला दुचाकी धडकल्याने एका तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली.
स्वतःच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून वीट भट्टीला जोरदार ठोस मारल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. आकाराम गोपाळ बारेला (वय २६ रा गारखेडा ता रावेर) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाल -रावेर रस्त्यावरील वीट भट्टीला आकाराम बारेला याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलची जबर धडक बसल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजेंद्र राठोड करीत आहेत.