जळगाव, प्रतिनिधी । जळगाव परिमंडळाअंतर्गत जळगाव ,धुळे व नंदुरबार मंडळातील घरगुती वीज ग्राहकांसाठी टाळेबंदीनंतरच्या वीजदेयकांच्या अनुषंगाने दि.२८ जुन ते १० जुलै या कालावधी दरम्यान तक्रार निवारण व शंका निरसन शिबीरे आयोजित करण्यात आलेली आहेत. तरी ग्राहकांनी नियोजित दिवशी संबंधीत उपविभाग वा कक्ष कार्यालयाचे ठिकाणी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले आहे.
ग्राहकांना ग्राहक क्रमांकाच्या आधारे आपल्या देयकांची गणना व पडताळणी करण्याची सुविधा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ लिंकवर उपलब्ध आहे. तरीही आपले समाधान झाले नसल्यास ग्राहकांनी तक्रार निवारण व शंका निरसन शिबीराचा लाभ घ्यावा. शिबीरात सहभागी होणाऱ्या वीजग्राहकांनी मास्क परिधान करणे , सॅनिटायझरचा वापर करणे , सामाजिक अंतर राखणे आदी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन करावे.
शिबीराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
जळगाव मंडळ -जळगाव मंडळातील उपविभाग व कक्ष कार्यालयात दि.२८ जुन ते १० जुलै या कालावधीदरम्यान सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन केले आहे. चाळीसगाव विभागातील चाळीसगाव ग्रामीण उपविभाग १ मधील गणेशपुर, टाकळी व मेहुणबारे (दि.२९ जुन ). तळेगाव कक्ष १, पातोंडा व बहाळ (दि.३० जुन ) तळेगाव कक्ष २, खेडगाव. चाळीसगाव शहर उपविभाग क्रमांक २ व ३ (दि.२ जुलै), टाकळी, वाघळी, खडकी व दहिवद (दि.३ जुलै) ,सांगवी (दि.४ जुलै ). जळगाव विभागातील जळगाव शहर क्रमांक १ व २, जळगाव ग्रामीण, नशिराबाद उपविभागात आदर्शनगर व भादली (दि.२९ जुन ), महाबळ , प्रभात कॉलनी , पिंप्राळा कक्ष १ व विदगाव (दि.३० जुन). पॉवर हाऊस ,सिंधी कॉलनी व म्हसावद (दि.१ जुलै ), एमआयडीसी क्रमांक २ , पिंप्राळा कक्ष २, शिरसोली, चिंचोली व भादली (नशिराबाद) (दि.२ जुलै ). एमआयडीसी क्रमांक १ , जळगाव शहर उपविभाग २ व वावडदा (दि.३जुलै ). जळगाव शहर उपविभाग १ व कानळदा (दि.४ जुलै ). असोदा (दि.६ जुलै ) , नशिराबाद ग्रामीण (दि.७ ते ९ जुलै ) नशिराबाद शहर (दि.१० जुलै ). पाचोरा विभागातील नगरदेवळा, पाचोरा क्रमांक १ , पाचोरा क्रमांक २. भडगाव व पारोळा या उपविभागातील कजगाव व पारोळा शहर (दि.२९ जुन ). नगरदेवळा व पारोळा ग्रामीण १ (दि.३० जुन ), भडगाव शहर १ व २ , पिंपळगाव हरेश्वर, नेरी, पारोळा ग्रामीण २ व खेडगाव (दि.१ जुलै ). लासगाव, लोहटार, आमडदे, गोंदगाव, मंगरूळ व पाचोरा शहर क्रमांक ३, (दि.२ जुलै ). लोहारा, भडगाव ग्रामीण १ व २, बहादरपुर व शिंदाड (दि.३ जुलै ). कोळगाव, नांद्रा, मोहदी व पाचोरा ग्रामीण (दि.४ जुलै ) या कक्षाचे ठिकाणी , भुसावळ विभागातील भुसावळ शहर उपविभाग (दि.३० जुन), पहूर उपविभाग (दि.२ जुलै) व जामनेर उपविभाग (दि.३ जुलै) उपविभाग कार्यालयाचे ठिकाणी, भुसावळ ग्रामीण उपविभागातील साकेगाव (दि.३० जुन) व फेकरी (दि.२ जुलै) कक्षाचे ठिकाणी, मुक्ताईनगर विभागातील बोदवड, मुक्ताईनगर व वरणगाव उपविभागातील कक्षाचे ठिकाणी बोदवड शहर व मुक्ताईनगर शहर (दि.२९ जुन ) बोदवड ग्रामीण १, करकी व चांगदेव (दि.३० जुन ), ऐनगाव, वरणगाव शहर व अंतुर्ली (दि.१ जुलै ) , बोदवड ग्रामीण २ , वरणगाव ग्रामीण १ व कुऱ्हा (दि.२ जुलै ), शेलवड, वरणगाव ग्रामीण २, वडोदा व कोठली (दि.३ जुलै), कोलादी , मुक्ताईनगर ग्रामीण व उचंदा (दि.४ जुलै ), तळवाडे (दि.६ जुलै ), आचेगाव (दि.७ जुलै ), सावदा विभागातील यावल, फैजपुर, सावदा व रावेर उपविभागात यावल शहर (दि.३० जुन ), फैजपुर शहर (दि.१ जुलै), सावदा शहर (दि.२ जुलै ), रावेर शहर (दि.३ जुलै) कक्ष कार्यालयाचे ठिकाणी, रोजी शिबीराचे आयोजन केले आहे. परिमंडळस्तरावर मुख्य अभियंता यांनी जळगाव ,धुळे व नंदुरबार मंडळातील औद्योगिक ग्राहक व ग्राहक संघटना प्रनिनिधीसमवेत वेबिनारव्दारे संवाद साधून ग्राहकांच्या टाळेबंदीच्या कालावधीतील वीजदेयकांच्या शंकाचे निरसन करून व वीजपुरवठ्यासंदर्भातील अडचणींची दखल घेतली आहे. दरम्यान, प्रत्यक्ष मीटर वाचनानंतर ग्राहकांना एप्रिल, मे व जुन या तीन महिन्याचे कालावधीचे एकत्रित देयक वीज युनिटच्या टप्पेनिहाय दर आकारणीच्या लाभासह (स्लॅब बेनिफिट) दिले आहे. ज्या ग्राहकांनी वीजदेयकांचा भरणा केला आहे. त्या भरणा रक्कमेची वजावट करून देयके दिली आहेत.