जिल्ह्यात १११ नवीन कोरोना पॉझिटीव्ह; जळगाव, भुसावळात वाढला संसर्ग !

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात १११ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात एकट्या जळगाव शहरात 55 तर भुसावळ येथील १७ रूग्णांचा समावेश आहे. तर रुग्णांची एकूण संख्या ३०८२ झाली आहे.

 

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १११ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रुग्ण जळगाव शहरात तर त्या खालोखाल भुसावळमध्ये  १७ रुग्ण आढळले आहेत. जळगाव ग्रामीण ८, अमळनेर ०, चोपडा १, धरणगाव ६, यावल ०३, एरंडोल ८, जामनेर ३, रावेर ४, पारोळा १, पाचोरा १, बोदवड ४ रुग्णांचा समावेश आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे

जळगाव शहर ६६१, ग्रामीण १०३, भुसावळ ४०७, अमळनेर २८५, चोपडा २१४ , पाचोरा ७५, भडगाव १६३, धरणगाव १३२, यावल १४६ , एरंडोल ११५ , जामनेर १५१, रावेर २१९, पारोळा २११, चाळीसगाव ३३, मुक्ताईनगर २५, बोदवड ४२, इतर जिल्हे १०, जिल्ह्यांव्यतिरिक्त ९० असे एकूण ३ हजार ८२ अशी आकडेवारी आहे.

Protected Content