विषप्रयोग करणारे माहिती झाले होते पण पुरावा नव्हता

 

मुंबई : वृत्तसंस्था । विषप्रयोग कुणी केला? हे मला कळलं होतं पण माझ्याकडे पुरावा नव्हता असं आता लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. १९६३ मध्ये लता मंगेशकर हे नाव सर्वश्रुत झालं होतं. लता मंगेशकर यांना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. अशात त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. .

“ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. मी खूप आजारी झाले होते. मी थोडेथोडके नाही जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. मात्र त्या अफवा होत्या. एकाही डॉक्टरने मला हे सांगितलं नव्हतं की तुम्हाला पुन्हा गाता येणार नाही. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला बरं केलं. त्यांनी मला या आजारातून बरं केलं. तीन महिने माझं गाणंही बंद होतं. मला भयंकर अशक्तपणा आला होता. त्यावेळी मी अशक्त झाले होते की मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता.”

विषबाधा कुणामुळे झाली होती हा प्रश्न विचारला असता माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळलं होतं. पण त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही कारण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचं आम्हाला नवल वाटलं होतं.

Protected Content