विश्वकर्मा मंदीराचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी जवळील कबनुर गावातील सुतार समाजाचे विश्वकर्मा समाज मंदीराची समाजकंटकांकडून तोडफोड करून दहशत निर्माण केली. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या वतीने जिल्हाधिकार अभिजित राऊत यांना सोमवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता निवेदन देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी जवळ असलेल्या कबनूर येथील सुतार गल्लीमध्ये विश्वकर्मा समाजाचे विश्वकर्मा मंदिर आहे. २३ जुलै रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास काही समाजकंटकांनी एकत्रित येऊन दहशत निर्माण करून समाज मंदिराची तोडफोड करून नुकसान केले आहे. याबाबत संबंधित समूहावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विश्वकर्मा समाज मंदिर हे आमच्या समाजाचा अस्मिता आहे. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू शकते. मंदिराची तोडफोड करणाऱ्यांवर तक्रार केली म्हणून तक्रारमागे घेण्यासाठी समाज बांधवांवर दबाव टाकण्यात येत आहे. कबनूर व इचलकरंजी येथील आमच्या समाज बांधवांच्या जीवितास धोका आहे. तरी या प्रकरणाचे गंभीर दाखल घेऊन संबंधित आरोपींवर कडक कारवाई करावी, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाज बांधवांनी दिला आहे.

 

या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष संजय दीक्षित, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख डॉ. श्रीराम सुतार, डॉ. बळवंत सुतार, राजेंद्र खैरनार, प्रवीण शिरसाट, भगवान वाघ, प्रल्हाद अहिरे, हेमंत भालेराव, राजेंद्र निकम, सागर वानखेडे, सिंधू चव्हाण, रोहिदास मिस्तरी, राजेंद्र दांडगे, भागवत रुले, कल्पना बुंदेल, राहुल मिस्त्री, विजय जंजाळकर, विकास पायरे यांच्यासह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content