विशाखापट्टणममध्ये गॅस गळती ; आठ लोकांचा मृत्यू

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था) आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधील व्यंकटपूरम गावामध्ये आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास केमिकल फॅक्ट्रीतील गॅस लीक झाल्यामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे. तर एक हजारपेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली आहे.

 

केमिकल कारखान्यातून वायू गळती सुरू होताच परिसरात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत जळजळ होऊ लागली. अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, गॅसगळती थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. वायूचा कमाल प्रभाव सुमारे एक ते दीड किमी परिसरात होता, तर वास दोन ते अडीच किमी भागात पसरला होता.

Protected Content