विविध सामाजिक उपक्रमांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा वाढदिवस साजरा

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा वाढदिवस आज सर्व शासकीय नियमांचे पालन करून विविध जनहितार्थ उपक्रमांनी राबवत साजरा करण्यात  आला.

 

रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवरांसह  सर्वसामान्यांनीही  मोठ्या संख्येने उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या.

 

आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा वाढदिवस होता. सध्या सुरू असणार्‍या कोविडच्या आपत्तीमुळे त्यांनी वाढदिवसाला फक्त सामाजिक उपक्रम साजरे करण्याचे ठरविले होते. या अनुषंगाने आज पिंप्राळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रारंभी रक्तदान शिबिराचे रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन महापौर सौ. जयश्री   महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यानंतर परिसरातील नागरिकांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर परिसरातील विविध कॉलन्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महापौरांसह शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी गजानन मालपुरे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

 

यानंतर महापालिकेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांना आयुक्त, उपायुक्तांसह बहुतांश नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ज्येष्ठ नगरसेवक नितीन बरडे, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, गजानन देशमुख, पार्वताबाई भील, प्रशांत नाईक, भारत कोळी, गणेश सोनवणे, रियाझ बागवान, सरीता माळी-कोल्हे, सुनील ठाकूर, दीपक जगताप, हर्षल संकत, शोभाताई चौधरी, विजय राठोड यांच्यासह इतर सदस्यांनी उपमहापौरांचे अभिष्टचिंतन केले.  कार्यालयात अनेक सामाजिक संघटनांनी केक कापून उपमहापौरांचा वाढदिवस साजरा केला.

 

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी गरजूंना अन्नदान करण्यात आले. नगरसेवक चेतन संकत, सचिन पाटील, ऍड. दिलीप पोकळे, हर्षल मावळे, कुंदन काळे, उमेश सोनवणे, अमजद खान (पांडेजी)  आदींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यात रेल्वेस्थानक परिसर, बस स्थानक परिसर आदींसह शहरातील विविध भागांमध्ये अन्नदान करण्यात आले.

Protected Content