जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाकोद ग्रामपंचायतमध्ये सत्ता बदलानंतर वेळोवेळी पंचायत समिती स्तरावर सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या खोट्या तक्रारी देऊन त्रास दिला जातो. त्याच बरोबर समस्या सुटत नसल्यामुळे वाकोद येथील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थांनी जामनेर पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मागण्या पुढील प्रमाणे – ग्रामपंचायत निकषानुसार ठराव सह दिलेले मंजूर प्रधानमंत्री आवास योजनेची ड व रमाई आवास योजनेतील यादी घरकुल पात्र लाभार्थी यादी छेडछाड करून यादीत परस्पर फेरफार केले आहे याची चौकशी व्हावी ग्रामपंचायत दिलेल्या शौचालय पात्र लाभार्थी मंजूर करावे. दलित सुधार योजनेच्या 55 लाखाच्या कामाच्या प्रस्ताव सादर करूनही तो मंजूर झालेला नाही. त्याची चौकशी करून वाकोदसह जाभूळ येथील दलित वस्ती कामाचा विकास पासून वंचित राहत आहे. वाकोद वाडी भागातील पाणीपुरवठा संदर्भात तत्कालीन गट विकास अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांना राजकीय दबाव पोटी केलेल्या खोट्या व चुकीची चौकशीची श्रेय समितीकडून फेर चौकशी व्हावी यांच्यासह विविध मागण्यासाठी वाकोद येथील सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह ग्रामस्थ पुरुष महिला मंडळी मोठ्या प्रमाणावर जामनेर पंचायत समिती समोर ही आंदोलन करीत आहे.