यावल महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने व्याख्यान

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह, यावल येथील गृहपाल प्रिया घोरपडे उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांनी भूषविले.

प्रिया घोरपडे यांनी प्रारंभी जागतिक आदिवासी दिनाची पार्श्वभूमी कथन केली. त्यांनी आदिवासींच्या विकासाच्या विविध योजना सांगून विचार व्यक्त केले की, शासकीय योजनांचा योग्य प्रकारे लाभ घेऊन शिक्षण प्रवाहात येऊन व्यक्तिमत्व विकसित करा तसेच समाजाच्या व देशाच्या विकासात योगदान द्या.

अध्यक्षीय भाषणात प्रा. ए. पी. पाटील यांनी शासन योजनांचे महत्त्व विशद केले. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार रा. से. योजनेचे प्रमुख डॉ. आर. डी. पवार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील, डॉ. पी. व्ही. पावरा, डॉ.एच. जी. भंगाळे, मिलिंद बोरघडे, शाहरुख तडवी, गौरव अडकमोल यांनी सहकार्य केले.

Protected Content