विवाहितेचा पैशांसाठी मारहाण करून छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहेर असलेल्या विवाहितेला घराचा हप्ता व कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ४० लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका भागात माहेर असलेल्या विवाहितेचा हरियाणा राज्यातील गुरगाव येथील अब्दुल अजीम अब्दुल कय्युब यांच्याशी रितीरिवाजानुसार लग्न झाले. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती अब्दुल अजीम याने घराचा हप्ता व कर्ज फेडण्यासाठी तसेच ननंद हिच्या कापड दुकानाच्या व्यापारासाठी बाहेरून ४० लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे याचा राग पतीसह सासरच्या मंडळींना आला. दरम्यान पतीने वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. बुधवार १४ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती अब्दुल अजीम अब्दुल कय्युब, सासू शहनाज अब्दुल कय्युब, दीर नदीम अब्दुल कय्युब तिघे रा. गुरगाव, हरियाणा, ननंद अफरीन जमील खान रा. मलकापूर, ननंद सदफ इम्रान बेग रा. वर्धा या पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content