गोलाणी मार्केटमध्ये पॅरागॉन कंपनीचे बनावट माल विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर छापा

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केटमध्ये पॅरागॉन कंपनीचे बनावट माल विक्री करणार्‍या विक्रेत्यावर कंपनीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून मु्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर येथील श्रेयस कोरवी हे सह्याद्री कॉपीराइट प्रोटेक्शन या फर्ममध्ये फिल्ड ऑफीसर म्हणून नोकरीला आहे. त्यांना पॅरागॉन पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पॉवर ऑफ अर्टनी दिलेले असून या कंपनीचा बनावट माल विक्री होणार्‍याठिकाणी जावून तेथे छापा टाकून कारवाई करण्याचे अधिकार त्यांना दिले आहे. त्यानुसार पॅरागॉन कंपनीचा बनावट माल शहरातील गोलाणी मार्केटमधील ऐ विंगमधील दुकाननंबर २१६ मधील जयेश फूटवेअर येथे विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. याठिकाणी कारवाई करण्यासाठी त्यांनी ठाणे अंमलदार संजय झाल्टे यांना पत्र दिले.

 

पोलिसांना पत्र दिल्यानंतर पोलिस निरीक्षक ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार प्रफुल्ल‍ धांडे व योगेश बोरसे यांच्यासह कंपनीचे अभिजीत भोसले, रितेश खैरनार यांच्यासह त्यांनी जयेश फूट वेअर या दुकानावर छापा टाकला. दुकानावर छापा टाकताच याठिकाणी दुकान मालक विजय भगवान राठोड वय-४५ रा. कासमवाडी सरस्वतीनगर यांची चौकशी केली. दरम्यान अधिकार्‍यांनी दुकानाची झाडाझडती घेतली असता, त्यांना दुकानात पॅरगॉन कंपनीच्या नावाने बनावट माल आढळून आला. तसेच त्यावर कंपनीचे हुबेहुब लेबल लावलेले होते  तर ते विना बॉक्समध्ये होते. दरम्यान विक्रेत्याने स्वताच्या फायद्यासाठी कंपनीचा बनावट माल विक्री केल्याप्रकरणी दुकानचालक विजय भगवान राठोड यांच्याविरुद्ध कॉपीराईट ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content