पारोळा प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत अनेक अडचणींना तोंड देऊन रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून धान्य वाटप करत असल्याने त्यांना ५० लाखांचा विमा मिळावा, तसेच त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी तालुक्यातील दुकानदारांनी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुका स्वस्त धान्य दुकानांमधुन करण्यात येत असलेल्या विविध योजनांचे धान्य वितरण करतांना परवाना धारकांना विविध समस्यांना सामोरे जावत लागत आहे. यामध्ये शासना कडुन दिल्या जाणार्या योजनांच्या धान्याबावत जनतेमधे असणारी अपूर्ण माहिती व गैरसमज त्याच बरोबर स्थानिक राजकीय व तथा कथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या धान्य वाटपामधे होत असणार्या थेट हस्तक्षेपामुळे धान्य दुकानदाराना धान्य वाटप करताना जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे तर जावे लागतच आहे. त्याच बरोबर त्यामधुन दुकानदारावर खोटया व तथ्यहीन तकारी व फोन वा ऑनलाईनव्दारे दाखल केल्या जात आहे. वरील तकारीमुळे व ग्राहकांशी होणार्या वादामुळे दुकानदारांचे मनोवल कमी होत आहे. त्यातच भर म्हणुन प्रशासनाकडून आगामी मे महिन्याच्या वाटपाकरिता प्रत्येक दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
तसेच केंद्र शासनाकडून दिल्या जाणार्या मोफत धान्य आणि वाटपाच्या कमिशन बाबतही कोणतीही स्पष्टता आढळुन येत नाही. त्याच बरोबर कोरोना सारख्या महामारीच्या आजाराच्या होणार्या फैलावामुळे दुकानदारांमध्ये प्रचंड भितीची भावना आहे. कारण सर्वच जण आपआपल्या जिवीताची सरंक्षण करण्याकरिता घरामध्ये वसुन असताना दुकानदार मात्र दररोज १०० ते १५० वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे त्याला यावाबत फार मोठा धोका आहे. त्यामुळे दुकानदाराकरिता किमान ५० लाख रूपये इतके विमा सरंक्षण मिळावे. सध्या असलेल्या लाकडाऊनच्या काळात शासनाने माहे एपिल, मे, जुन महिन्याचे धान्य वाटप धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये तीन पकारात धान्य वाटप करावे लागत आहे. म्हणजेच त्याच महिन्याव्दारे तीन पट काम करावे लागत आहे .हे कामही दुकानदार व संबंधित पुरवठा विभाग व महसुल विभाग यंत्रणा आपले कर्तव्य व सामाजिक जवाबदारी भावनेतुन करित आहे. परंतु त्याबाबतचा कोणताही उल्लेख शासनाकडुन कला जाताना आढळुन येत नाही. असे या ठिकाणी खेदाची बाब आहे असे वाटते. यामुळे परवानाधारकांना ३१ जुलै २०२० पर्यत रजेची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात रेशन दुकानदारांनी खालील मागण्या केलेल्या आहेत.
१.कोरोना महामारीच्या काळात दुकानदाराना ५० लाख रु. चे विमा सरक्षण मिळावे.
२. दुकानदारांची मोफत आगेग्य तपासणी केली जावी.
३. दुकानदारांबाबत केल्या जाणार् या तकारीची सत्यता पडताळुनच चौकशी व्हावी.
४.दुकानदाराना धान्य वाटप करताना सरक्षण मिळावे.
५. मोफत धान्य वाटपाच्या कमिशन वावत स्पष्टता करून ते बरीत अदा करण्यात यावे.
६. केसरी काई धारकांना दिल्या जाणार्या धान्यांकरिता ७० रू. ऐवजी १५० रू. कमिशन
मिळावे. जावे,
७.दुकानदारावर केलेल्या खोटया तक्रारीच्या तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा ..
८. सद्याच्या अडचणीतल्या काळाच्या धान्य वाटपाकरिता किमान आवश्यकता असलेले मास्क सॅनिटायझर सारख्या सुविधा पुरविण्यात याव्या .
असे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे यांना देण्यात आले.
यावेळी सर्व नियमांचे पालन करून निवेदन दिले पारोळा तालुक्यात रेशन दुकानदार निवेदनावर रेशन दुकानदार के के पाटील, मनोहर वाणी, भिकन महाजन, दिलीप सोनकुळे, किशोर पाठक, यशवंत पाटील, दिलीप सैंदाणे, बापू मराठे , शकील बेग, दिवाणजी खानोरे, गुलाब पाटील, वसंत पवार, कल्पना मराठे, भगवान पाटील, स्मिता पाटील, पिरण पाटील, वंदनाबाई पाटील, प्रदिप सुखदेव पाटील यांची उपस्थिती होती.