विना निविदा सफाई ठेका संदर्भात पोलिसांत तक्रार करणार : विरोधी पक्षनेते सुनील महाजन(व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सफाईचा ठेका वाटरग्रेस कंपनीला देण्यात आला होता. मार्च महिन्यात त्यांचे काम थांबवून एस. के. कॉन्ट्रॅक्टरला हा ठेका देण्यात आला. आजवर विना निविदा हे काम हा ठेकेदार करीत आहेत. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप शिवसेना मनपा विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला .

सुनील महाजन यांनी पुढे म्हणाले की, एस. के. कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून निविदेपोटीची देखील रक्कम घेण्यात आलेली नाही. तसेच कामगारांच्या पगाराचे पैसे मनपा प्रशासन थेट कामगारांच्या बँक खात्यात वर्ग न करता ठेकेदाराच्या खात्यात वर्ग करीत आहे. गैरव्यहार करणारे प्रशासन आहे सांगून सत्ताधारी गटाने या ठेक्यात गैरव्यवहार चालविला आहे. याबाबत लवकरच पोलिसांकडे तक्रार नोंदविणार असल्याचे तसेच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यानिशी बाजू मांडणार आहोत असेही त्यांनी सांगितले. ठेकेदाराला ९ मजूर पुरविण्याचा ठेका होता. मात्र आजवर ६०० च्या वर कामगार ठेकेदाराने पूरविले आहे. मनपा प्रशासनाने सरकारी पैशाचा अपव्यय केला आहे. यामुळे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करू असे सुनील महाजन यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन बरडे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे उपस्थति होते.

https://www.facebook.com/watch/?v=1235413013469264

 

Protected Content