विधानसभा निवडणुकीत जनजागृतीची धुरा भाजपा पदाधिकाऱ्याकडे : जिल्हाध्यक्ष मराठे यांनी केली चौकशीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रात २०१९ मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने जनजागृतीसाठी सुरु केले फेसबुक पेजची हाताळणी भाजपच्या आयटी सेलकडे होती असे तथ्य समोर आले आहे. याप्रकरणाची चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व मुख्य निवडणूक आयुक्त सूनील अरोरा यांच्याकडे दूरध्वनी केली आहे.

एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व मुख्य निवडणूक आयुक्त सूनील अरोरा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करतांना सांगितले की, २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणं अपेक्षित असतांना हा प्रकार लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांना धक्का पोहचवणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी पेज सुरु केले होते. हे पेज भाजपच्या यूथ विंगच्या (BJYM) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक देवांग दवे हाताळत होता याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.

Protected Content