टास्क फोर्सशी चर्चेनंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय : उपमुख्यमंत्री

पुणे | राज्यातील शाळा सुरू होण्याबाबत स्पष्टता नसतांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टास्क फोर्ससोबत चर्चा करूनच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे येथे सांगितले. 

 

अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात लोक कोरोनायचे नियम पाळत नाही म्हणून ही वेळ आली आहे. पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका. सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले.

 

काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी असा सवाल अजित पवारांनी सांगितला.

 

 

दरम्यान राज्य सहकारी बँकेवर एऊची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं अजित पवार म्हमाले. धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले. काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो. मी ४० वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.

 

Protected Content