जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची शिफारस पक्षातर्फे करण्यात आली होती. तथापि, मला यात रस नव्हता. या पार्श्वभूमिवर, येऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळावी अशी मागणी आपण पक्षाकडे केली असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली दिली. माजी मंत्री खडसे हे आज जळगावात आले होते त्यावेळी ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
नुकत्याचा पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी वर केली होती. मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नव्हतो आणि निवडही झाली नाही. राज्यातील राजकरणात मला रस असून मला विधानसभेवर संधी मिळावी, अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेते यावर साकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास असल्याचा खडसें यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या विषयावरून बोलतांना खडसे म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची निवड करावी, कधी करावी तसेच किती काळासाठी करावी, याचे सर्वस्वी अधिकार व स्वातंत्र्य राज्यपालांना आहे. ते मान्य करून चालावे लागणार आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय
जळगाव जिल्ह्यात काही कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यातील १२ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू दर अधिक आहे. मात्र जिल्हा आरोग्य विभागाकडून हलगर्जीपणा अमळनेरच्या बाधित रूग्णावरून दिसून आला आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी घरी राहून आपली व आपल्या परीवाराची काळजी घ्यावी, असे आवाहनही यावेळी खडसे यांनी केले आहे.