Home क्राईम विद्यूत तारेचा आकडा काढण्यावरून दोघांना मारहाण

विद्यूत तारेचा आकडा काढण्यावरून दोघांना मारहाण

0
37


 

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निमखेडा येथे इलेक्ट्रिक तारवर टाकलेला आकडा काढण्याच्या कारणावरून प्रौढ व्यक्तीसह त्याच्या मुलाला सहा जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील निमखेडा येथे भारती दगडू पाटील (वय-४०) या विवाहिता आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील इलेक्ट्रिक पोलवरील तारांवर टाकलेला आकडा काढण्याच्या कारणावरून शेजारी राहणारे दीपक धैर्यसिंग राठोड यासह इतरांनी महिलेच्या पती व मुलास शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहे. त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात बुधवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता विवाहितेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी दीपक धैर्यसिंग राठोड, दिनेश नवल राठोड, नवल नामदेव पाटील, दिनेश धेर्यसिंग राठोड, अरुण किसन पाटील आणि पुरुषोत्तम गंगाराम पाटील सर्व रा. निमखेडा ता.धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करीत आहे.


Protected Content

Play sound