जळगाव, प्रतिनिधी । गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलच्या बाजूला विद्युत कॉलनीतील एका बंगल्यात दुपारी आग लागली होती. ही आग अग्निशमन दलाच्या २ बंबांनी आटोक्यात आणली.
आज मंगळवार ६ एप्रिल रोजी दुपारी ३:२५ मिनिटांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलच्या बाजूला विद्युत कॉलनीत जिल्हापरिषद मुख्य लेखाधिकारी विनोद गायकवाड यांच्या बंगल्यात आग लागली असता घटनास्थळी तत्काळ जाऊन अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी व सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २ बंबानी संपूर्ण आग विझवली. आग चालू असताना बंगल्याच्या किचनमध्ये आणि बाथरूममध्ये गॅस LPG सिलेंडर आणि किचन मध्ये LPG सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून होणारा मोठा अनर्थ टाळला. अग्निशमन दलाचे जवान रोहिदास चौधरी, देविदास सुरवाडे वाहन चालक,भगवान पाटील, वसंत कोळी, हिरामण बाविस्कर, प्रदीप धनगर वाहन चालक, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, संजय भोईटे या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/258038445975310