जळगाव, प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष वीरेश गोपाळराव पाटील यांनी कुलगुरू यांना सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की, मागील दोन वर्षापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या अनेक गैरव्यवहारच्या बातम्या प्रसारमाध्यमंद्वारे समोर येत आहे. यातून आपल्या नामवंत विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासन आणि शासन स्तरावर कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली दिसत नाही तरी त्वरित सर्व गैरव्यवहारांच्या संदर्भात सखोल चौकशी व्हावी व दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आधीच सर्व विद्यार्थी त्रस्त आहेत आणि त्यात विद्यापीठाची कामकाज सुरळीत होत नाही तसेच तोच विद्यापीठ कर्मचारी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे विद्यापीठ जर त्यांच्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्य असलेल्या तसेच विद्यापीठ कायद्याप्रमाणे केलेल्या मागण्या पूर्ण करीत नसेल तर विद्यापीठाला विद्यापीठ कार्याचा विसर पडला की काय आणि या संघर्षात सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी आता कोणाकडे न्याय मिळावा असा प्रश्न निर्माण होतो तरी आपण आपल्या स्तरावरून याबाबतची गंभीर दखल घ्यावी व विद्यापीठात काम सुरू करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष वीरेश गोपाळराव पाटील, उप जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, रज्जाक सैय्यद, महानगर अध्यक्ष संदीप मांडोळे,उप महानगर अध्यक्ष इमाम पिजारी, अनवर भिस्ती यांची स्वाक्षरी आहे.