घोडगावची हर्षदा पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम

 

चोपडा, प्रतिनिधी ।तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी बी निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी हर्षदा सुनील पाटील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत व तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

हर्षदा पाटील चोपडा तालुक्याच्या ग्रामीण भागातून सर्वप्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून १९९ वी आली आहे. हर्षदा हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचा व तिचे पालक सुनील पाटील यांचा सत्कार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यात संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा चोपडा नगरपालिकेचेउपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी व नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते कौतुक व सत्कार करण्यात आला.  हर्षदाचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी. चौधरी, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content