जळगाव प्रतिनिधी । आदिवासी विद्यार्थांनी त्यांच्या विषयात विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकार केल्यास व्यक्तिमत्व विकासाला मदत होईल असे प्रतिपादन प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आदिवासी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.मोहन पावरा हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख हे होती. सदर कार्यक्रमात कार्यक्रम समन्वयक प्रा.बी.सी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.साहेब पडलवार यांनी केले. याप्रसंगी प्रा.डॉ.मोहन पावरा यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थेने न्यूनगंड निर्माण केला आहे. परंतु मूळ आदिवासी हा निडर बोलका व धाडसी आहे. त्याने या गुणांची ओळख करून आयुष्यात प्रगती साधावी असे आग्रहाने प्रतिपादन केले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा संघर्ष करण्याची मूळ प्रवृत्ती असते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करावे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना आदिवासी नृत्याच्या तालावर विचारमंचाकडे घेऊन आले. मान्यवरांनी बिरसा मुंडा आदिवासी, देवता याहामोगी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी माल्यार्पना नंतर महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी “स्वागत केजे, आजे,आमु या गुरू लोगु “या आदिवासी स्वागत गीतावर मान्यवरांचे स्वागत केले.
पहिल्या सत्रात प्रा.डॉ. जगदीश पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा कौशल्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ.सुभाष महाले यांनी साहित्यातील आदिवासी संस्कृती व आजची स्थिती यावर आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ.राहुल संदांशिव यांनी स्वतःचा शोध व रोजगार संधी या विषयावर आदिवासी विद्यार्थ्यांशी हितगुज केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख, डॉ. इंदिरा पाटील व प्रा.मीनाक्षी वाघमारे यांनी केले तर सदर कार्यशाळेत पाहुण्यांचा परिचय प्रा.सुनील खर्डे, प्रा. भैय्यासाहेब देवरे प्रा. रजनी अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ललिता हिंगोनेकर यांनी केले. या कार्यक्रमाला २०० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा.आर.बी. देशमुख, प्रा.माधुरी पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यशस्वितेसाठी प्रा.डॉ. डी.आर.चव्हाण, प्रा.डॉ. अफाक शेख, प्रा. मनोहर शिंदे, सागर सोनवणे, जगदीश सोनवणे, सुनील पाटील, प्रा.डॉ. जेपी सोनटक्के, इंदिरा लोखंडे, रीना पवार यांनी प्रयत्न केले.