पाकिस्तानात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा अमेरिकेकडून निषेध

merlin 166791237 4aa0d19d fafe 4ef0 8dee a7eb0e9787d6 articleLarge 1

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | आपल्या देशातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करत नसल्याबद्दल अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानचा निषेध केला. २७ देशांच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हे विधान केले. पाकिस्तानात हिंदूंबरोबर होत असलेल्या छळाचा त्यांनी उल्लेख केला.

 

“इराकमध्ये याझिदी, पाकिस्तानात हिंदू, बर्मामध्ये मुस्लिम आणि नायजेरियात ख्रिश्चन अशा धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी, कट्टरपंथीयांचा आम्ही निषेध करतो” असे पॉम्पिओ म्हणाले. पाकिस्तानात हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. लग्नासाठी हिंदू मुलींचे जबरदस्ती धर्मांतर होत असल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांचे हे विधान महत्वपूर्ण आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युनायटेड किंगडम, इस्रायल, युक्रेन, नेदरलँड आणि ग्रीस हे प्रमुख देश आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषदेचे सदस्य आहेत. अल्पसंख्यांकाच्या हक्काचे रक्षण करणे, हा या परिषदेचे प्रमुख उद्देश असेल, असे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले.

Protected Content