यावल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींची सप्टेंबरमध्ये मुदत संपणार

23BMVOTERSLIST

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सप्टेबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकासाठी प्रभाग रचना व आरणाचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

या गावांचा आहे सहभाग
निवडणूक विभागाकडून तालुक्यातील सप्टेंबर अखेरपर्यंत मुदती संपणाऱ्‍या आगामी ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्य्रकम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार होणाऱ्‍या निवडणूकीमध्ये तालुक्यातील चिंचोली, दहीगाव, उंटावद, शिरसाड, मनवेल, पिळोदे खुर्द, बोरावल बुदु्रक, भालशिव, पिप्री, बामनोद, वनोली, अंजाळे, टाकरखेडा, बोरावल खुर्द, कोळवद, कासवे, दुसखेडा, सांगवी खुर्द, हंबर्डी, राजोरा, बोरखेडा बुद्रुक, विरावली, वड्री, शिरागड, हिंगोणे, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, आमोदे, विरोदा, वढोदा प्र., सावदा, नावरे, डोणगाव, किनगाव बुदु्रक, आडगाव, अट्रावल, भालोद, नायगाव, सावखेडासीम , मोहराळे, कोरपावली, महेलखेडी, वढोदे प्र. यावल, पिंपरूड, कोसगाव, मारूळ, डांभुर्णी, निमगाव, सातोद या गावा समावेष आहे.

येथील ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय रचना व हरकती आणी सुचना मागविण्याच्या रूपरेषा कार्यक्रम जाहीर केला असुन या कार्यकमाअंतर्गत ७ ते १४ फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेला प्रसीध्दी, हरकती व सुना मागवणे, २० फेब्रुवारी प्राप्त सुचना व हरकती प्रांताधिकारी यांचेकडे सादर करणे, २९ फेब्रुवारी प्राप्त हरकतीवर प्रांताधिकी यांचेकडे सुनावणी व व अभिपा्रयासह जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करणे, २१ मार्च रोजी अंतीम प्रसिध्दि असा कार्यक्रम आहे. या २०२०च्या ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकीसाठी महसुल प्रशासनाने प्राधिकृत मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी अशा सुमारे शंभरहुन अधिक अधिकारी नेमणुक आहे. असे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी कळविले आहे.

Protected Content