विख्यात कोरिओग्राफर सरोज खान कालवश

मुंबई प्रतिनिधी । बॉलिवुडच्या विख्यात कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज निधन पहाटे उपचार सुरू असतांना निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरोज खान (वय ७२) यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. तथापि, याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. दरम्यान, उपचार सुरू असतांना आज पहाटे दोनच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसापूर्वी आजारी पडल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु, ती निगेटीव्ह आली होती. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

सरोज खान यांनी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी सह अनेक सुपर स्टारला डान्स शिकवला होता. श्‍वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना १७ जून रोजी वांद्रे येथील गुरूनानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पहाटे त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

सरोज खान यांनी आपल्या करिअरची सुरूवात बँकग्राऊंड डान्सर म्हणून वयाच्या तिसर्‍या वर्षी केली. गीता मेरा नाम या चित्रपटात १९७४ मध्ये सरोज खान यांनी स्वतंत्र कोरिओग्राफर म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. त्यांनी सुमारे २००० च्या वर गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. यात मिस्टर इंडिया (१९८७) तील हवा हवाई, तेजाब (१९८८) मधील एक दो तीन, बेटा (१९९२) मधील धक धक करने लगा, देवदास (२००२) मधील डोला रे डोला या गाण्यांचा समावेश आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सरोज खान यांच्या मृत्यूने मनोरंजन उद्योगावर शोककळा पसरली आहे.

Protected Content