जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वावडदा वि.का.सह सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत नम्रता पॅनल नी १३ जागानी विजय मिळवला आहे. त्यात सुमनबाई कोमल पवार सगळ्यात जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत.

मत रुपी दिलेल्या आशिर्वादाचे गावकऱ्यांचे सर्व सभासद बांधवांचे कोमल पवार यांनी आभार मानले. गावकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले असून त्याची येणाऱ्या काळात परतफेड केल्या शिवाय राहणार नाही असं देखील पवार म्हणाले.
सगळ्यात जास्त मत सुमनबाई कोमल पवार यांना मिळेल असून महिला राखीव मतदारसंघातून निवडून लढवली होती. आमचा कारभार सभासद बांधवांचा हिताचा राहील असं देखील त्यानी सांगितले. नम्रता पॅनल सुमनबाई कोमल पवार यांना चेअरमनपदाची संधी देणार असून त्याना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. त्या धनगर समाज चाळीसगाव तालुका अध्यक्ष विशाल धनगर यांच्या आजी आहेत.