वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी मध्यरात्री पकडले

जळगाव प्रतिनिधी । नदीपात्रातून वाळू ट्रॅक्टरने शहरात वाहतूक करत असतांना मध्यरात्री गस्त असलेल्या पोलिसांनी शिवाजीनगर येथे पकडून तहसीलदारांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस रात्रीच्या शिवाजीनगरातील लाकूडपेठ परिसरात  गस्ती करत होते. दरम्यान रात्री २ वाजेच्या सुमारास कानळदा रस्त्याकडून ट्रॅक्टर येत होते. पोलिसांनी हे वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना किंवा परवानगी नसल्याची बाब समोर आली. ट्रॅक्टर विना पासिंग क्रमाकांचे असून चालकाने त्याचे नाव सनी सुकलाल ठाकरे रा. आव्हाणे ता.जि.जळगाव तर वाहन मालकाचे नाव श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी असे सांगितले. याप्रकरणी कारवाई संदर्भात हे प्रकरण पोलिसांनी तहसिलदार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Protected Content