जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिकनगरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री १२.३० वाजता ही घटना घडली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
रवींद्र बन्सीलाल सोनवणे (वय ३६, रा.वाल्मिकनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. कौटंुबिक वादामुळे रवींद्र हे पत्नीपासून विभक्त झाले होते. ११ मे रोजी रात्री १२.३० वाजता त्यांच्या आई घराबाहेर झाेपलेल्या असताना रवींद्र यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोठ्याने आवाज झाल्यामुळे कुटंुबियांना ही घटना कळाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवींद्र यांना मृत घोषित केले. मंगळवारी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटंुबियांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत रवींद्र यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.