यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील परसाडे परिसरात रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात बांधलेले घर कोसळल्याने घोड्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील परसाडे गावातील पीरखा ललाखा तडवी यांचा मालकीचा घोडा गावातील बांधलेले पत्र्याचे घर होते. या ठिकाणी त्यांचा घोडा बांधण्यात आलेला होता. रविवारी २९ मे रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास चक्रीवादळ आल्याने घोडा बांधलेले घर कोसळले. यात घोड्याचा दाबला गेल्याचे त्याचा मृत्यू झाला.
अत्यंत गरीब अशा कुटुंबातील पिरखा तडवी यांच्या कुंटुबाचा पोटापाण्याचे उदरनिर्वाहाचे साधन असलेला पांढरा शुभ्र असल्यामुळे घोडा याची परिसरात मोठ्या प्रमाणात नवरदेवांची लग्नसाठी मागणी असायची, या वादळी वाऱ्यात तो मरण पावल्याने आदिवासी कुटुंबाचे सुमारे २ लाखांचे नुकसान झालेले आहे. कुटुंब उघड्यावर आल्यासारखं झालेले असल्याने तडवी कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
या घटनेचा पंचनामा परसाडे येथील तलाठी समीर तडवी व ग्रामसेवक मजीत तडवी यांच्यासह अश्वमालक पिरखा तडवी यांच्या उपस्थित करण्यात आला. शवविच्छेदन डॉ. भगुरे पशुवैद्यकीय अधिकारी यावल यांनी केले. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थित मरण पावलेत्या अश्वचा ( घोडा ) याचे दफन विधी कुटुंबातील सदस्य प्रमाणे केला करण्यात आले आहे. घटना प्रसंगी हुसेन तडवी माजी सरपंच रमेश सावळे, माजी उपसरपंच बाबासाहेब शंकर भालेराव, परसाडे ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थ शिराजून तडवी, आरिफ तडवी, शब्बीर तडवी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .