वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईन- पालकमंत्री आदिती तटकरे

रायगड वृत्तसंस्था । नुकत्याच झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. येथील नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हृयातील माणगाव तालुक्यातील माणगाव, गोरेगाव, मोर्बा, सुर्ले आदिवासीवाडी, नागाव, वडवली, पुरार, वणी, नांदवी, इंदापूर इत्यादी नुकसानग्रस्त भागांची पाहाणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण कटिबद्ध असल्याचं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शहरी आणि ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाले असून वीज पुरवठाही खंडित झालेला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करुन सर्वांना तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत मिळेल. ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे, त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पोहाेचविले जात आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

Protected Content