चाळीसगाव येथे तीन रूग्ण कोरोनामुक्त; टाळ्या वाजवून केले स्वागत

चाळीसगाव प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढत होत असतांना दुसरीकडे कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. आज चाळीसगाव कोवीड केअर सेंटरमधून तीन रूग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

शहरातील चौधरी वाडा परिसरातील तीन रूग्ण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांना चाळीसगावातील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज तिघांचा कोराना अहवाल निगेटीव्ह झाल्याचे प्राप्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोराना आजारावर मात केल्यानंतर चौधरी वाड्यात आल्यावर रहिवाश्यांनी त्यांचे टाळ्‌या वाजवून व फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार अमोल मारे, तालुका आरोग्य निरीक्षक डॉ. देवराम लांडे, रोशन जाधव, रामचंद्र जाधव, बंटी ठाकूर, गौतम जाधव, सुरेश चौधरी, दिलीप चौधरी, सदानंद चौधरी, आप्पासाहेब चौधरी, अमोल चौधरी, जगदीश चौधरी, अनिल चौधरी यांची उपस्थिती होती.

Protected Content