वाढीव विज बिलामुळे नागपुरात एकाची आत्महत्या !

नागपूर (वृत्तसंस्था) लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचे वीज बिल चक्क ४० हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. लीलाधर गायधणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

 

नागपूरमधील यशोधानगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. लीलाधर गायधणे यांना एकत्रित तब्बल ४० हजार रुपयांचे वीज बिल आले होते. अचानक एवढ्या मोठ्या रक्कमेचे वीज बिल आल्यामुळे गायधणे अस्वस्थ झाले होते. त्यांनी बिल कमी करावे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली होती. पण, अनेकदा प्रयत्न करुनंही वीज बिल कमी झाले नाही. उलट बिल न भरल्यास घरातील वीजही खंडीत होण्याची भीती त्यांच्या मनात तयार झाली. अखेर त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली, अशी माहिती गायधने यांच्या कुटुंबाने दिली.

Protected Content