जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मागणी केल्यानुसार वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे.
नशिराबाद परिसरातील अनेक शेतकर्यांनी रब्बी हंगामात गहू, हरभरा, दादर, बाजरीची पेरणी केली आहे. या पिकांना पाण्याची आवश्यकता भासत असल्याने वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे केली. या अनुषंगाने त्यांनी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र दिले. त्यानंतर शनिवारी आवर्तन सोडण्यात आले.