चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील वाकडी गावाच्या वळणावरील तीनशे फुट रस्त्यांचे काम अपूर्ण असल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. यामुळे तातडीने हे काम पूर्ण करण्याची मागणी सरपंच प्रकाश पाटील यांनी केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून चाळीसगाव ते नागद या रस्त्याचे काम सुरू आहेत. दरम्यान तालुक्यातील वाकडी गावातील वळणावरील अतिक्रमणामुळे ३०० फुट रस्त्यांचे काम गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. त्यात जांमडी पर्यंतच रस्त्याचे काम झाले आहे. यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तातडीने सदर रस्त्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी सरपंच प्रकाश पाटील यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. दरम्यान अशाच प्रकारे वाघडू येथे अतिक्रमण धारकांनी अडवणूक केल्यामुळे तेथेही रस्ता अपूर्णच आहे. त्यामुळे अतिक्रमण काढून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.