वसुंधरा अभियानांतर्गत आसोदा येथे रांगोळी स्पर्धा

 

जळगाव, प्रतिनिधी ।  पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून वसुंधरा मातेला जैवविविधतेने वैभवसंपन्न करणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन जळगाव गट विकास अधिकारी मंजुषा गायकवाड यांनी केले. जिल्हा परिषद केंद्रशाळा असोदा येथे शनिवार दि. ६ फेब्रूवारी रोजी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना गायकवाड बोलत होत्या.

 

कार्यक्रमास प्रमुख अतिथी कक्ष अधिकारी  आबेदा तडवी तसेच विस्ताराधिकारी प्रतिमा सानप, असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे, मुख्याध्यापिका सुनीता कोळी उपस्थित होते. कक्ष अधिकारी आबेदा तडवी मार्गदर्शनात म्हणाल्या की,’ पर्यावरण व प्रगतीचा समतोल साधणे काळाची गरज आहे अन्यथा पृथ्वीचा विनाश अटळ आहे. अभियाना अंतर्गत शालेय परिसरामध्ये गटविकास अधिकारी, कक्ष अधिकारी विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांच्या हस्ते देशी प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. अभियानांतर्गत घेतलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींना मुख्याध्यापिका सुनिता कोळी व विजय लुल्हे प्रायोजित रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. रांगोळी स्पर्धेतील  स्पर्धांचे परिक्षण सानप मॅडम व विजय लुल्हे यांनी केले. रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनी पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक विभागून : वंदना भिल्ल व सलोनी चव्हाण (इयत्ता ७ वी ), द्वितीय : कुंती जाधव (७ वी ), तृतीय : गंगा भिल्ल ( ५ वी ). प्रास्ताविक विजय लुल्हे यांनी केले. नरेंद्र जगताप यांनी उपस्थितांची  पर्यावरण प्रतिज्ञा घेतली. रांगोळी स्पर्धेसाठी  योगिनी सोनवणे व  रेखा डाळवाले, नरेद्र जगताप यांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन अर्चना गरूड व आभार सोनल महाजन यांनी मानले. केले.

 

 

 

 

 

Protected Content