Home क्राईम शतपावली करणाऱ्या वृध्दाच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला

शतपावली करणाऱ्या वृध्दाच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला

0
37


जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुचाकीवरील अज्ञात दोघांनी शतपावली करत असलेल्या वृध्दाच्या हातातून मोबाईल लांबविल्याची घटना शुक्रवारी ५ फेब्रुवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी  जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, सुनील पाटील रा. भास्कर मार्केट हे आपल्या पत्नी पुष्पा सुनिल चौधरी यांच्यासोबत आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्य चौक शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी निघाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पायी जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पसार झाले आहे. त्यांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला असता चोरटे मिळून आले नाही. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुष्पा चौधरी यांच्या फिर्यादीवरून  जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Protected Content

Play sound