जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथून एका व्यवसायिकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, वर्जन श्रावण चव्हाण (वय-३४, रा.वसंतवाडी ता.जिल्हा जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. न्हावीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २४ जून रोजी रात्री ११ ते २५ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या पूर्वी त्याने त्याची दुचाकी एमएच १९ बी एल ४४८९) ही घरासमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर वर्जन चव्हाण यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर बुधवार २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.