जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यासह राज्यात इंधनाचे दर दररोज वाढतच आहेत. गेल्या वर्षी २० मार्च २०२१ रोजी याच दिवशी असलेले दर आणि आजचे दर पाहता त्यात तब्बल १८ ते १९ रुपयांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल डीझेलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. यात अनेक घटक पेट्रोलसह अन्य इंधनाची किंमत ठरवतात, यात की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी अन्य घटकांचा विचार होऊनच किमती निर्धारित होतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या प्रती बरल किमती वाढतात त्यावेळी भारतीय बाजारपेठेत देखील इंधनाच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून येते. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून जीवनावश्यक वस्तूंची देखील भाववाढ झाली आहे.
आजचे इंधनाचे दर एक वर्षा पूर्वीचे दर सरासरी
शहर पेट्रोल प्रति लिटर डिझेल पेट्रोल प्रति लिटर डिझेल
अहमदनगर १२०.३२ १०३.०३ दिल्ली – ९६.२१ ८७.६७
धुळे १२०.८९ १०३.५७ मुंबई – १०२.१० ९२.१९
जळगाव १२०.४४ १०३.१४ जळगाव १०१.८५ ९१.००
नंदुरबार १२०.८९ १०३.५८
नाशिक १२०.९२ १०३.५९