“वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये’ त्रिकयाची नोंद

भुसावळ- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नाहाटा महाविद्यालयातील प्रा. डॉ. विलास महिरे यांच्या सव्वा वर्षाच्या मुलाने १ मिनिट ३७ सेकंदात जास्तीत जास्त मानवी शरीराचे अवयव ओळखण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. यामुळे त्याची “वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये’ नोंद झाली आहे.

शहादा तालुक्यातील काथरदे खुर्द येथील मूळ रहिवाशी व सध्या भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील प्रा. डॉ. विलास नाना महिरे व प्रज्ञा पवार-महिरे यांचे चि. त्रिकय (वय-१ वर्ष ५ महिने) याने कमी वयातील भारतीय बालक म्हणून १ मिनिट ३७ सेकंदात जास्तीत जास्त मानवी शरीराचे अवयव ओळखण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. त्याची दखल “वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये घेण्यात आली आहे. या यशाचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते त्याला मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर व त्याचे आजोबा सिद्धार्थ पवार (वरिष्ठ लिपिक, बदलापूर नगरपरिषद) उपस्थित होते. त्याच्या यशस्वीते मागे त्याचे आई-वडील, मामा प्रा. प्रशांत पवार आणि कुटूंबातील नातेवाईकांचे मार्गदर्शन लाभले.
चि. त्रिकय हा नंदुरबार येथील नाना महिरे आणि माजी प्राचार्य अशोक पवार यांचा नातू आहे.

Protected Content