मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळले आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ सध्या वरळी कोळीवाडा सील केला आहे.
वरळी कोळीवाड्यात आढळून आलेल्या कोणत्याही रुग्णांने परदेश दौरा केला नव्हता. तसेच कोणत्याही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले नव्हते. तरीही या लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या चारही रुग्णांचे वय ५० च्या वर आहे. यातील एक रुग्ण ट्रॉम्बेमधील पीएसयूमध्ये स्वयंपाकाचे काम करत असे. तर इतर तिघेही स्थानिक नोकर्या करतात आणि जास्त प्रवास करत नाहीत. परंतू लोकांनी लॉकडाऊन पाळायला हवा अन्यथा व्हायरसचे सक्रमण जलदगतीने होण्याचा धोका आहे. या कॉलनीमध्ये दुमजली इमारती आहेत. अनेक जण सामुहिक शौचालयाचा वापर करतात. यातील बहुतेक मच्छिमार आहेत ते याचठिकाणी राहतात आणि काम करतात. काही दिवसांपूर्वी प्रभादेवी येथे 65 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. शुक्रवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. या बाईचाही कोणताही परदेश दौरा नव्हता किंवा तिचा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाशीही संबंध नव्हता असे असतानाही ही घटना घडली. ती महिला मेस चालवत होती त्यामुळे या खानावळीत जेवण करणाऱ्यांचा शोध घेणे महापालिकेपुढे मोठे आव्हान आहे.