तनुश्री दत्त पुनरागमन करणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । तनुश्री मधल्या काही वर्षांत बॉलिवूडपासून दूर होती. ती इथे पुन्हा आली. पण चित्रपटांपेक्षा ती वेगळ्या कारणांसाठीच चर्चेत राहिली. आता मात्र तिनं पुनरागमन करायचं ठरवलंय.

अभिनेत्री तनुश्री दत्ता मधल्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सुरू झालेल्या ‘मीटू’ चळवळीदरम्यान बरीच चर्चेत होती. तिचा स्पष्टवक्तेपणा, बिनधास्तपणा सर्वांनाच माहीत आहे.

तनुश्री भारतात पुन्हा आल्यावर तिच्या दिसण्यावर, वजनावर बरीच टीका केली गेली. त्यावरही तिनं वेळोवेळी उत्तर दिलं आहे. आता तर तिनं ते कृतीत आणलंय. मनोरंजनविश्वात परत सक्रिय होण्यासाठी तिनं १५ किलो वजन कमी करून दाखवलंय.

ती सध्या तीन मोठ्या बजेटच्या दाक्षिणात्य चित्रपटकर्त्यांच्या संपर्कात असून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे. तर काही कास्टिंग एजन्सीबरोबरही तिचं बोलणं सुरू आहे. वेब सीरिजसाठीही तिचा विचार केला जातोय.

. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटापासून स्टार झालेली तनुश्री पुन्हा एकदा अभिनयाची चमक दाखवायला सज्ज झाली आहे. तिच्या पुनरागमनाच्या बातमीनं तिचे चाहते सुखावले आहेत.

तनुश्रीनं अमेरिकेतली चांगली नोकरी सोडली आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतल्या संरक्षण मंत्रालयातील एक ऑफर धुडकावून लावली आहे.

Protected Content