कंजरवाड्यात दोन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; दोन महिलेवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीर दोन गावठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून उद्ध्वस्त केले. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कंजरवाडा परिसरात अवैधरित्या देशी हातभट्टी दारूची तयार करून विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या सुचनेनुसान एलसीबीचे पोहेकॉ कमलाकर बागुल, महिला कॉन्स्टेबल ललिता सोनवणे, पोकॉ. शरद भालेराव, अनिल देशमुख, रामकृष्ण पाटील, दीपक पाटील यांनी आज पहाटे कारवाई करून संशयित आरोपी माधुरी गोविंदा बाटुंगे (वय-२८, रा. सिंगापूर कंजरवाड) ही बेकायदेशीर दारू तयार करून विक्री करत असतांन रंगेहात पकडले. कारवाईत साडे पाच हजार रूपयांची गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली.

तर दुसऱ्या घटनेत एलसीबीचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, पोहेकॉ अनिल इंगळे, विलास पाटील, रमेश चौधरी, महिला कॉन्स्टेबल ललिता सोनवणे, पो.ना. संतोष मायकल यांनी सिंधी कॉलनी परिसरातील कंजरवाडा परिसरात गावठी दारू बनवितांना संशयित आरोपी बेबीबाई हिरा नेमले (वय-५५ रा. सिंगापूर कंजरवाड) हीला रंगेहात पकडले. संशयित महिलेच्या ताब्यातील ५ हजार ८०० रूपये किंमतीचे गावठी दारू हस्तगत केली तर कच्चे व पक्के रसायन नष्ट केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

Protected Content