कोरोना : शेंदुर्णी नगरपंचायततर्फे जंतूनाशक फवारणी

शेंदुर्णी प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा शहर, गाव व खेड्यात कोरोना विषाणूचा फैलाव व संसर्ग होऊ नये म्हणून राज्य सरकारने शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने गावात विषाणू प्रतिबंधात्मक जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

राज्य सरकारने खेडे गावच्या गावच्या ग्रामपंचायत पासून तर शहरातील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपया अंतर्गत जंतुनाशक फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. आज नगरपंचायत कडून आज संपूर्ण गावातील मुख्य गल्ल्यांमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. खास फवारणी यंत्र मागविण्यात आले असून गावातील मुख्य रस्त्यावर फवारणी करण्यात येत आहे. यासाठी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या देखरेखीखाली सर्व नगरसेवक आपापल्या प्रभागात फवारणी करून घेत आहे. मुख्याधिकारी साजिद पिंजारी, नगर अभियंता भय्यासाहेब पाटील, पाणीपुरवठा अभियंता काझी यांच्यासह नगरपंचायत स्वच्छता विभागाचे कर्मचारी फवारणीसाठी परिश्रम घेत आहेत. या आधी पंपाने औषधी फवारणी, फोगिंग मशीन फवारणी करण्यात आली. परंतु सदरची फवारणी करतांना गावातील वाढीव वस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या वस्त्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Protected Content