यावल शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात आज कोरोना विषाणू या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या नगर परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात सह यावल शहरातील पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यात येत आहे.

कोरोना विषाणू हे वाढते प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले असून अत्यंत धोकादायक अशा या कोरोना विषाणू पासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी यावर नगर परिषदेच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रभाग निहाय जंतुनाशक पावडराची तसेच निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी करण्यात येत आहे. आज 30 एप्रिल रोजी यावल नगरपरिषदेच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावलच्या तहसील कार्यालयात सर्वत्र फवारणी करण्यात आली. मात्र अद्यापही नगरपालिकेच्या माध्यमातून पांडुरंग सराफ नगर, पालक नगर, चांदनगर, आयशा नगर याच्यासह अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी उद्यापर्यंत करण्यात आलेली नसल्याने नागरिका मध्ये आपल्या आरोग्याला घेऊन भीतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी शहरातील विविध उर्वरित भागात निर्जंतुकीकरण फवारणी करावी, असे मागणी नागरिक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Protected Content