आशा वर्कर यांना नगरसेवक उल्हास पगारे यांनी केले सॅनिटायझर वाटप

भुसावळ, प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा, एका विस्फोटा सारखा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज दि. २७ मे पासून, वार्ड क्र. २ मधे सर्व नागरिकांचे बॉडी टेम्परेचर व ऑक्सिजन लेव्हल चेक करण्याची सुरुवात झाली आहे. यात आशा वर्कर यांना पुरेशा सुविधा देण्यात आल्या नसल्याचे नगरसेवक उल्हास पगारे यांना आढळून आले असता त्यांनी आशा वर्कर यांना स्वतःसॅनिटायझर वाटप केले.

भुसावळ नगरपालिकेतर्फे बॉडी टेम्परेचर व ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी आशा वर्कर्सच्या ४ टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. या तपासणीच्या कामाची पाहणी करतांना नगरसेवक उल्हास पगारे यांच्या निदर्शनास आले की तपासणी करणाऱ्या अशा वर्कर यांच्याकडे सॅनिटायझरचीची खूपच कमतरता होती. अश्या परिस्थितीत उल्हास पगारे यांनी स्वतःस सॅनिटायझर आणून आशा वर्कर यांना दिले. नागरिकांची तपासणी करत असतांना स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी, अशी सदिच्छा आशा वर्कर यांना दिली. काही अशा वर्कर यांना ताप व ऑक्सिजन लेव्हल मोजता येत नव्हता, हा प्रकार लक्षात येताच पगारे यांनी वैद्यकीय अधिकारी, व प्रांताधिकारी सुलाने यांच्याशी संपर्क करून हा सर्व प्रकार सांगितला. तात्काळ भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, व वैद्यकीय अधिकारी डॉ. फलटणकर , हे आपल्या अधिकाऱ्यांसोबत समतानगर येथे दाखल झाले, व सर्व प्रकार जाणून घेतला. “आशा वर्कर यांना चांगली ट्रेनिंग द्या व प्रभावीपणे काम करा”, असा आदेश प्रांताधिकारी सुलाने यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला. या पुढे, कोणत्याही नागरिकांला सर्दी, ताप, खोका किंवा श्वास घेण्यास त्रास असेल, त्यांनी लवकरात-लवकर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचवावे, जेणेकरून त्यांच्यावर उपचार करून त्यांना लवकर सुखरूप घरी परत आणता येईल, असे आवाहन उल्हास पगारे यांनी नागरिकांना केले.

Protected Content