वरणगाव : प्रतिनिधी । भाजप पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्यानंतर आज येथील ग्रामीण रुग्णालयाचा बिल न भरल्याने खंडित केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला
ग्रामीण रुग्णालयाचां वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला होता त्यामुळे लसीकरण प्रशासनाने बंद केले सामाजिक कार्यकर्ते राजेश काकांनी यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष सुनील माळी , कामगार नेते मिलिंद मेढे , जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैस , सरचिटणीस गोलू राणे , भाजयुमोचे संदिप भोई , पप्पू ठाकरे , आकाश निमकर , दिपक चौधरी , बळीराम कोळी , साबीर कुरेशी , राहुल जंजाळे , नत्थू कोळी , हितेश चौधरी , डी . के . खाटीक , डॉ सादिक अल्लदिन , कृष्णा माळी , संदीप माळी , नटराज चौधरी , ज्ञानेश्वर घाटोळे , गजानन वंजारी , योगेश माळी , योगेश चौधरी , डॉ प्रवीण चांदणे यांचा ताफा ग्रामीण रुग्णालयात पोहचला
या सर्वांनी डॉ क्षितिजा हिंडवे , उपकार्यकरी अभियंता तुषार गांजरे , श्री पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात यावे व रुग्णांची जी हेळसांड होत आहे ती थांबवून वीजपुरवठा त्वरित सुरू करा असा आग्रह धरला . माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी माजीमंत्री आ संजय सावकारे यांच्याकडे तक्रार केली आमदार सावकारे यांनी कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी संपूर्ण प्रशासन प्रयत्न करते आहे त्यात आपण वीज खंडित करता आहात हे सहन केले जाणार नाही असे खडसावले व त्वरित वीजपुरवठा सुरू करा अशी तंबी भरली लगेच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला
यापुढे नाहक ग्रामीण रुग्णालयाची व जनतेची वीज खंडित केल्यास जनांदोलन उभारणार असल्याचा इशारा भाजपा अनुसूचित मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे यांनी यावेळी दिला