आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाचा निकाल जाहीर

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील नावाजलेली शिक्षण संस्था आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अध्यक्षपदी उमेश पाटील, उपाध्यक्षपदी विनायक पाटील तर चिटणीसपदी उमाकांत पाटील यांनी विजय मिळविला आहे.

८ मे २०२२ रोजी झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी विनायक रामदास पाटील (गजू पाटील) यांना १२० मते मिळून त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र ओंकार चौधरी यांचा  अवघ्या ४ मतांनी पराभव केला. तर चिटणीसपदासाठी प्रा. उमाकांत रूपचंद पाटील यांना १३१ मते मिळून त्यांनी  महेंद्र प्रल्हाद सरोदे यांचा २६ मतांनी पराभव केला. अध्यक्षपदी उमेश प्रभाकर पाटील यांची  मिठाराम मुरलीधर महाजन यांचे नामांकन अर्ज अवैध ठरल्याने बिनविरोध निवड घोषित झाली.

संस्थेच्या एकूण ३०४ सभासदांपैकी २३६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १४ उमेदवारांपैकी निवडून आलेले कार्यकारिणी सदस्य व त्यांना मिळालेली मते  पुढीलप्रमाणे – प्रमोद भागवत वाघुळदे (२००), धनराज शेनफडु चौधरी(१८९), ललित हेमंत महाजन(१८८), प्रवीण पुरुषोत्तम महाजन(१८५), नामदेव भास्कर पाटील(१५६), वैभव तोताराम चौधरी(१५३), एकनाथ धोंडू लोखंडे(१३८), सुभाष दिनकर महाजन(१३१) हे उमेदवार निवडून आले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस.बी. बोठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले. यावेळी उपस्थितांनी विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत व अभिनंदन  केले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!