हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेला सुरूवात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेला आज शुक्रवार १६ जुलै रोजीपासून सुरूवात करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गावाती सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात येत आहे. 

हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी, डॉ. अभिषेक ठाकूर, तालुका हिवताप पर्यवेक्षक व्ही.डी. नेमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी १६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हिंगोणा गावातील नागरीकांचे डेंग्यू सदृष्य लक्षणांचे सर्वेक्षण, गावातील कंटेनर तपासणी करून गावाती साचलेल्या पाण्यांच्या डबक्यामध्ये गप्पी मासे सोउून डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरूवात करण्यात आली. गावातील प्रत्येक घरांमध्ये व घरांसमोर असलेल्या पाण्याच्या टाक्या, माठ, रांजण, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, भांडे व इतर कंटनेरमधील पाण्याची पाहणी केली. डेंग्यू आजाराबाबत माहिती देण्यात आली.  आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन सविस्तर मार्गदर्शन प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली .

यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, डॉ.अभिषेक ठाकुर, तालुका हिवताप पर्यवेक्षक व्ही.एन. नेमाडे, आरोग्य पर्यव्यक्षक घनश्याम डोळे, आरोग्य सेवक त्र्यंबक सावळे, विलास महाजन, कनिष्ठ साहाय्यक पंकज चोपडे, आरोग्य कर्मचारी व सर्व आशा वर्कर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.  

Protected Content