जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शिरसोली रस्त्यावर असलेल्या वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील रामदेववाडी येथून अज्ञात चोरट्यांनी ८ हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेले आहे. याबाबत गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव वन परिमंडळ विभागाचे शिरसोली जळगाव रस्त्यावर रामदेववाडी येथे कक्ष क्रमांक ४१५ येथे वनविभागाच्या मालकीचे लोखंडी अँगल ठेवण्यात आले होते. हे ८ हजार रुपयाचे लोखंडी अँगल अज्ञात चोरट्यांनी २ नोव्हेंबर रात्री १० ते ३ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान चोरून नेल्याचे समोर आले आहे. वनपरिमंडळ विभागाचे अधिकारी संदीप नामदेव पाटील (वय 47, रा. पोस्टल कॉलनी, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या चक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.